निवड… अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी शाहरुख शेख

– माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते गौरव

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाला अधिकची बळकटी देण्यासाठी अल्पसंख्याक सेलच्या तालुका अध्यक्षपदी येथील युवक शाहरुख शेख यांची निवड करण्यात आली.

शाहरुख शेख यांचा तालुक्यात असलेला विशाल जनसंपर्क व पक्षासाठी सातत्याने करीत असलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली.

मारेगाव स्थित शेतकरी सुविधा केंद्रात झालेल्या कांग्रेस मेळाव्यात माजी मंत्री विजय वडेट्टीवार , माजी आमदार वामनराव कासावार , डॉ. महेंद्र लोढा , नरेंद्र ठाकरे , तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहरुख शेख यांनी नियुक्तपत्र देत गौरविण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment