– नगरपंचायतच्या विशेष सभेत एकमताने नियोजित दारू दुकानाचा ठराव नामंजूर
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव प्रभाग क्रमांक 12 मध्ये होत असलेल्या दारू दुकानाचा विरोध करण्यासाठी आज सोमवारला अर्धनग्न आंदोलन डॉ.आंबेडकर चौकात करण्यात आले.नगरपंचायतने विशेष सभेचे आयोजन करून सर्व 17 नगरसेवक यांनी प्रचंड विरोध करीत एकमताने ठराव नामंजूर केला.परिणामी लेखी आश्वासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मारेगाव येथील नव्याने प्रभाग क्रं.12 मध्ये दारू दुकान सुरू करण्याचा घाट रचल्या जात आहे.यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचे सर्वाधिक संभाव्य शक्यता असल्याने हे दारू दुकान सुरू करण्याच्या विरोधात येथील नागरिकांनी अर्धनग्न आंदोलन करीत एल्गार पुकारला.
या आंदोलनाची प्रशासनाने खडबडून दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ आज विशेष सभेचे आयोजन केले.यात सर्व 17 नगरसेवकांनी नियोजित दारू दुकानाचा प्रचंड विरोध करीत एकमताने ठराव पारित केला.यापुढे सदर नियोजित दुकानदार यास कोणत्याही सकारात्मक कागदपत्राची पूर्तता न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
परिणामी , आंदोलन स्थळी ठाणेदार जनार्धन खंडेराव , प्रभारी मुख्याधिकारी अरुण भगत , राज्य उत्पादन शुल्क अधिकारी वानखेडे यांचे सह 17 नगरसेवकांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा करीत संवेदनशील व धार्मिक स्थळ असलेल्या बुद्ध विहारा ला भेट दिली. नियोजित व्यवसायास विरोध दर्शवित कोणतेही सहकार्य न करण्याचे अभिवचन यावेळी देण्यात आले.
सर्वच अधिकारी यांनी बुद्ध विहाराजवळ भेट देत नियोजित व्यवसायाबाबत खेद व्यक्त केला.यावेळी शेकडो महिला पुरुष यांची उपस्थिती लक्षणीय होती.दरम्यान प्रशासनाच्या लेखी आश्वासानंतर अर्धनग्न आंदोलनाची सांगता करण्यात आली.