– मारेगाव तालुक्यातून जनतेची तोबा गर्दीने वेगवेगळ्या खमंग चर्चा
मारेगाव : दीपक डोहणे
आई वडील आणि सासू सासरे यांचेकडील भक्कम राजकीय वारसा अरूनाताई खंडाळकर यांना लाभलेला. तीस वर्षाचा मोठा राजकीय अनुभव अरूनाताई यांना आहे. पंचायत समिती सदस्य,सभापती ते थेट जिल्हा परिषद सभापती पर्यंत अरुणाताई खंडाळकर यांनी बरेच शह कटशहाचे राजकीय अनुभव घेतले.परवा ताईचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला अन या सोहळ्यात कांग्रेस चे वामनराव कासावार, नरेन्द्र पाटील ठाकरे यांची बॅनर पासून कार्यक्रम पर्यंत गैरहजेरी खूप चर्चेचा विषय ठरली. अरुणा ताई यांनी “आम्ही तुमचे गुलाम नाही” हाच मोठा संदेश या निमित्ताने कांग्रेस च्या काही नेत्यांना देऊन टाकल्याचा हजारो उपस्थितात तर्कवितर्क लावल्या जात आहे.
ताईच्या वाढदिवस सोहळ्यात व्यासपीठावर आमदार प्रतिभाताई धानोरकर , कल्पना मांगुळकर , टिकाराम कोंगरे , संजय देरकर , विवेक मांडवकर , उत्तमराव गेडाम , वसंतराव आसुटकर , अनिल पा. देरकर , खालीद पटेल , उदय रायपूरे , वंदना आवारी , प्रा. राठोड ताई , नानाजी डाखरे , गजानन खापणे आदींची सर्व जाती धर्माच्या अनुभवी नेत्यांची उपस्थिती होती.मात्र माजी आमदार व माजी बाजार सभापती यांना कुठेही स्थान नव्हते. विशेष म्हणजे नव्यानेच जनहीतचे सोंग धतुरे उभारून कांग्रेस मध्ये कीड पसारणाऱ्या पोष्टर छाप स्वयंघोषित पुढाऱ्या सह तालुका अध्यक्ष यांना कोसो दूर ठेवण्यात आले.
यावेळी कोरोना मध्ये भरीव कार्य करणाऱ्या आशावर्कर यांचा गौरव करण्यात आला. पदाधिकारी,कार्यकर्ते व निकटवर्तीयांनी ताई ला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा प्रदान केल्या.यावेळी प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले. ताईच्या आतापर्यंत केलेल्या सामाजिक,राजकीय कार्याचा लेखाजोखा मांडला. सूत्रसंचालन प्रा.सतीश पांडे , प्रस्तावित सुषमा काळे तर रविंद्र धानोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
या अभिष्टचिंतन कार्यक्रमाने सध्या मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. हा कार्यक्रम भविष्यात मारेगाव तालुक्यात राजकारणाची दिशाच पालटून टाकणार आहे. असे दिसून येते. इकडे ताईनी केक कापला पण तिकडे अनेकांच्या राजकीय नाड्या कटल्या. ताईच्या शुभेच्छा बॅनर मध्ये केठेही ‘नेत्यांना’ स्थान देण्यात आले नाही. त्याचे कारणही आहे. भाजपा हे कांग्रेसच्या उरावर बसली आहे. पण कांग्रेसच्या काही नेत्यांची मग्रुरी अजूनही उतरायला तयार नाही. हमाला सारखे काम करणाऱ्याला फाट्यावर बसवून देण्यात येत आहे. कांग्रेस चे काही बहाद्दर नेते सध्या ‘मलिंदा’ दिसले की नाक पुसायची लायकी नसलेल्या लोकांना राजमुकुट घालून देत आहे.
यातून शेतकऱ्यांचे रक्तपिपासू सावकार आता कांग्रेस चे अघोषित व स्वयंघोषित पुढारी म्हणून वानरा सारखा उडया मारत आहे. यामुळे तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी कमालीचे दुखावले आहे. अरुणा ताई च्या कार्यक्रमात ही खदखद अन चीड प्रामुख्याने अधोरेखित झाली. चार टपोरी पोरं घेऊन, जन हितीय सोंग उभे करुन, गावात पोष्टर बाजी करून, दारू मटण वाटून, नेत्यांचे पाय चाटून, लिफाफे फेकून जर कांग्रेस नेता होता येत असेल तर मग तन,मनाने झटणारे कार्यकर्ते केवळ साहेब आले, सतरंज्या उचला , धावा धावा करत राहणार काय ? असा संतप्त सवाल करत होते. अरूणा ताई सह प्रमुख दावेदार असणारे वसंतराव आसुटकर यांचा भक्कम लोकसंग्रह असतांना त्यांना डावलणे आता नेत्यांच्या अंगावर शेकणार आहे. अरुणा ताई यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या विश्वासाने आता कणखर अन ठोस भूमिका घेतली आहे. यामुळेच अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू अलगद सरकली आहे. भविष्यात कांग्रेस मध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे हे अरुणाताई च्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रामुख्याने दिसून आले.
प्रतिभाताईचे भाषणाने उपस्थितांचे ठोके थांबविले..!
विविध शासकीय योजनेत मी सातत्याने जनसामान्य जनतेचे प्रश्न अग्रक्रमी लावले.प्रत्येक विषयातील पैलुला हात घालतांना स्व.खा.बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणीला उजाळा देतांना आपल्या वीस मिनिटाच्या भाषणात ताईला अनावर अश्रू झाले. यावेळी अख्खा सभागृह स्तब्ध झाला.यावेळी हजारो उपस्थितांनी बाळूभाऊंच्या आठवणीला उजाळा देत भावनाविवश होत अश्रूला वाट मोकळी करून देत होते.