माजी जि.प. सभापती… अरुणाताई खंडाळकर यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा

– मारेगाव तालुक्यातील आशा वर्कर चा होणार गौरव

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

यवतमाळ जिल्हा परिषद च्या माजी सभापती सौ.अरुणाताई खंडाळकर यांच्या जन्मदिवसा निमित्त आज बुधवारला हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे.

जन्मदिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील शेकडो आशा वर्करचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

 

मारेगाव शेतकरी सुविधा केंद्रात आज सकाळी 11.30 वाजता होणाऱ्या अभिष्टचिंतन व गौरव समारंभास तालुक्यातील तमाम आप्तेष्ठी तथा कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने हजर राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment