– कोठोडा हायवे जवळील घटना
बोटोणी : सुनील उताणे – जय वनकर
मारेगाव वरून वृत्तपत्राचे पार्सल देत करंजीकडे जाणाऱ्या ओमनी कारला समोरून ट्रकने जबर धडक दिल्याने कार क्षतीग्रस्त होऊन तीन जन जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा पुला नजीक आज मंगळवारला सकाळी 6 वाजता घडली.
नागपूर वरून मराठी दैनिक वृत्तपत्र पार्सल घेऊन येणारी ओमनी कार क्रमांक M H 34 K 1954 ही आज सकाळी मारेगाव येथे वृत्तपत्र पार्सल देत पांढरकवडा कडे रवाना झाली.
राज्य महामार्ग असलेल्या कोठोडा पुला जवळ समोरून येत असलेल्या ट्रक ने कारला जबर धडक दिली.या अपघातात कारचा समोरील भाग चक्काचूर होत यातील चालक , वाहक व दोन प्रवासी पैकी एकूण तिघे जन जागीच ठार झाले.एक जन गंभीर जखमी असून त्याला पांढरकवडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान , भीषण अपघात होताच ट्रक सह चालक पसार झाला.मृतकात कार चालक किशोर बोरकर रा.आनंद चौक वरोरा जिल्हा चंद्रपूर असल्याची माहिती आहे.उर्वरित मृतक व जखमी चे नाव कळू शकले नाही.
अपघाताची भीषणता एवढी भयावह आहे की मृतक अजूनही जबर धडकेच्या वाहनात फसलेले आहेत.पांढरकवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.