– सहाय्यक आयुक्तांनी दिली फिर्याद
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील पांडवदेवी देवस्थान मागील जंगलात मानवी औषधी बेकायदेशीररित्या आढळून आल्याने पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली.त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात सोमवारला रात्री मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.मुख्य आरोपीचा छडा लावण्याचे कडवे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.
गेल्या शुक्रवारला आवळगाव जंगलात मुदतबाह्य औषधी साठा बेकायदेशीररित्या आढळून आला.याची पारदर्शक चौकशी अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी केली.घटनास्थळी पंचनामा करून तब्बल 55 हजार 332 रु.चा मुद्देमाल जप्त करीत मारेगाव न्यायालयात सुपूर्द केला.
सदर मुदतबाह्य औषधी बेकायदेशीर रित्या जंगलात फेकून दिल्याने मानवासह वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आणण्याचा प्रयत्नांचा ठपका ठेवण्यात आला.
यासंदर्भातील फिर्याद अन्न व औषधी प्रशासनाचे सहा.आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी मारेगाव पोलिसात दिली.त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 नुसार भादवी 336 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.या गंभीर प्रकरणाच्या तपासाचे चक्रे आता पीएसआय ज्ञानेश्वर सावंत व शंकर वारेकर फिरविणार आहे.