– पांढरकवडा (लहान) येथील घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
गावात मागील काही महिन्यापासून अवैध दारू विक्रेत्यांना चांगलाच कहर केला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. पोलीस कारवाई करत नसल्याने अखेर महिलां एकवटल्या आणि अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावरच छापा टाकत देशी दारूच्या बॉटल्स पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उठत आहे.सदर छापा मंगळवारी रात्री आठ वाजता दरम्यान टाकण्यात आल्याने येथील महिला प्रशंसेस पात्र ठरल्या आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिसगाव व पांढरकवडा (लहान) परिसरात अवैध दारू विक्री ,वरली मटका व्यवसायिकांनी चांगलेच डोके वर काढले. या विरोधात गावकऱ्यांनी अनेकदा पोलिसांना कळविले. मात्र ,याकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला होता. अशातच तरुण वर्ग दारूच्या आहारी गेल्याने चार जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान गावातील महिलांनी अचानक अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर छापा टाकत यावेळी 2800 रुपये किमतीची देशी दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी आरोपी संतोष आत्राम याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद आचलवार, जमादार राजू टेकाम पुढील तपास करीत आहे.
तालुक्यातील अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या लवकर आवळल्या जाईल. त्यापद्धतीचे नियोजन सुरू आहे.ग्राम पातळीवरील कौटुंबिक कलह व युवकांच्या दारू आणि मटका व्यसनावर पायबंद घालण्यासाठी आपण तात्काळ मुळावर घाव घालून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवू
जनार्धन खंडेराव
ठाणेदार,पोलिस स्टेशन, मारेगाव