– नागरिकांचे आरोग्य प्रभावित
– ग्रा.पं.च्या तकलादू धोरणाचा सर्वत्र संताप
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील चिंचमंडळ येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असून येथील नागरिकांच्या नशिबी गढूळ पाणी ग्रहण करण्याची वेळ आली आहे.ग्रामपंचायत पदाधिकारी या गंभीर प्रश्नावर मूग गिळून असून नागरिकांचे आरोग्यच धोक्यात येत असल्याचे भयाण वास्तव आहे.
येथील नागरिकांना सार्वजनिक विहिरीतून पाण्याची व्यवस्था आहे.थेट वर्धा नदीतून जलवाहिनीच्या सहाय्याने पाणी विहिरीत पोहचत आहे.मात्र हे पाणी पूर्णतः दूषित असल्याने स्थानिक प्रशासनाचे पदाधिकारी तोंडात बोटे घालून आहे.त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
येथील नागरिकांकडून हजारो रुपये वार्षिक कर आकारणी करण्यात येते.मूलभूत गरज वाऱ्यावर आहे.अशातच पाणी पुरवठ्यासाठी लाखो रुपये खर्च करूनही दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने नेमके कुठे पाणी मुरत आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
वर्तमान स्थितीत पावसाळ्याचा सुरू आहे. दूषित पाण्याचा पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य वेठीस आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत असतांनाच येथील पदाधिकारी मात्र या गंभीर बाबींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत नागरिकांचे मूलभूत प्रश्न ऐरणीवर आणत आहे.येथील तात्काळ शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.