शिक्षणाचा खेळखंडोबा… विद्यार्थ्यांनी भरविली मारेगाव पंचायत समितीत शाळा

– वरुड जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचे अभिनव आंदोलन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यातील वरुड येथील एक ते सात जिल्हा परिषद शाळेत एकाच शिक्षकाकडून अध्यापन करविल्या जात असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.येथे पुन्हा दोन शिक्षक तात्काळ नियुक्त करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी तब्बल 43 विद्यार्थ्यांनी थेट पंचायत समितीच्या प्रांगणात शाळा भरविली आहे.या अभिनव आंदोलनाने पंचायत समिती प्रशासनात खळबळ माजली आहे.

 

वरुड येथे 1 ते 7 पर्यंत जिल्हा परिषद शाळा असून 43 विद्यार्थ्यांची संख्या आहेत.मात्र एवढ्या विद्यार्थ्यांना केवळ एकच शिक्षक अध्यापन करीत आहे.त्यामुळे एका शिक्षकावरील ताण आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसानीची प्रशासना करवीचा बेदखलपणा यामुळे पालकांत प्रचंड संतापाची लाट उसळत आहे.

 

याचाच परिपाक म्हणून अतिरिक्त शिक्षकाच्या प्रमुख मागणीसाठी चक्क तब्बल 43 विद्यार्थ्यांनी मारेगाव पंचायत समिती प्रांगणात शाळा भरविली आहे.सोबत पालकांचीही उपस्थिती असून या अभिनव आंदोलनाची वृत्त लिहिपर्यंत प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती.

 

परिणामी , मारेगाव तालुक्यात तोडक्या शिक्षकामुळे अनेक शाळासह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर येवून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment