– मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत सुरला येथील घटना
मारेगाव – विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव पोलिस स्टेशन येणाऱ्या सुरला येथील विवाहीत महिलेने ग्लासात विष ओतून ग्रहण करीत तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारच्या मध्यरात्री 2 वाजता घडली.या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
प्रतिभा संतोष दूधगवळी (38) असे विष प्राशन करून जीवनयात्रा संपविलेल्या महिलेचे नाव आहे.
रात्री कुटुंबातील सदस्य साखरझोपेत असतांना सदर महिलेने कीटकनाशक डब्यातील द्रव्य चक्क ग्लासात ओतले आणि ग्रहण करीत इहलोकाची यात्रा केली.
दरम्यान , गत वर्षाला मृतक महिलेची लहान जाऊ अस्मिता कर्मवीर दुधगवळी हिनेही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तूर्तास आत्महत्येचे कारण समजू शकले नसून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.मृतक विवाहितेच्या पश्चात पती व दोन मुले आहेत.महिलेच्या टोकाच्या निर्णयाने हळहळ व्यक्त होत आहे.
परिणामी , सातत्याने होत असलेल्या आत्महत्येच्या मालीकाने मारेगाव तालुका प्रभावित झाला आहे.