– 22 वर्षीय युवक जागीच ठार -शिवनाळा फाट्यावरील घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
झिंगलेल्या अवस्थेत असलेल्या एका 22 वर्षीय युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री 9.30 वाजता मारेगाव तालुक्यातील शिवनाळा फाट्यानजीक घडली.
अनिल कृष्णा टेकाम असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
तो शिवनाळा येथील रहिवासी असून मारेगाव येथे गवंडी काम करायचा. रात्री उशिरा झिंगलेल्या अवस्थेत एका खासगी वाहनाने अनिल हा फाट्यावर उतरला.उभ्या अवस्थेत सैरभैर होत असतांना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली यात तो जागीच गतप्राण झाला.
मृतक अनिल याच्या पश्चात विधवा आई व बहीण आहे.