मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांचे स्थानांतरण

– नविन ठाणेदार जनार्दन खंडेराव आज होणार रुजू

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार राजेश अशोकराव पुरी यांची वणी येथे बदली झाली असून नविन ठाणेदार म्हणून यवतमाळ येथून जनार्धन एकनाथराव खंडेराव आज मारेगाव पोलिस स्टेशनचे सूत्रे हाती घेणार आहेत.

 

यवतमाळ जिल्हा आस्थापना मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतलेल्या निर्णयानुसार ही प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.

दरम्यान , 13 आँक्टोबर 2021 ला रुजू झालेले मारेगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार राजेश पुरी यांनी आपल्या पावणे दोन वर्षात आपल्या कर्तव्याचा वेगळा ठसा उमटविला.शेकडो गावे संलग्नित असलेल्या मारेगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा वचकही त्यांनी निर्माण केला होता.कायद्याची चाकोरी , मवाळ स्वभाव , गुन्हेगारी , व्यसनाधीन प्रवृत्तीला समजावून सांगण्याची सोज्वळ पद्धतीने मारेगाव तालुक्यातील अनेक नागरिकात आपुलकीचे संबंध दृढ केले.आपल्या कर्तव्यात कसूर न करता सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना आपलंसं करून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली.

 

प्रशासकीय सेवेतील सकारात्मक कर्तव्य पार करून त्यांचे वणी पोलिस स्टेशन येथे स्थानांतरण झाले आहे.यवतमाळ शहरचे ठाणेदार जनार्धन एकनाथराव खंडेराव हे मारेगाव पोलिस स्टेशनचे नविन ठाणेदार असतील.ते आज मारेगाव ठाण्याचा भार स्वीकारणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून “विटा” ला प्राप्त झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment