– बोटोणी अपघातात एक जागीच ठार
– सहकारी दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरून पोबारा
बोटोणी : सुनिल उताणे
मारेगाव वरून करंजीकडे जाणाऱ्या दुचाकीवरील इसम ट्रकच्या चाकात आल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना आज बुधवारला सायंकाळी 6.30 वाजताचे दरम्यान बोटोणी गतिरोधक नजीक घडली.
मारेगाव वरून दोघे जन दुचाकीने करंजीकडे जात असतांना बोटोणी जवळील सराटी फाट्याजवळ असलेल्या गतिरोधक वरून दुचाकी वरील मागील सहकारी उसळून पडून मागावून येत असलेल्या ट्रकच्या मागील चाकाच्या खाली पडला.यात तो जागीच ठार झाला.मात्र दुचाकीस्वार सहकारी याने अपघाताची भिषणता पाहून घटनास्थावरून पोबारा केला.
परिणामी , अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव अद्याप पर्यंत कळू शकले नाही.पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करीत ट्रक ताब्यात घेतला असून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आला आहे.