– वाहनाच्या मालकांनी कागदपत्रे आणून वाहन घेऊन जाण्याचे ठाणेदार पुरी यांचे आवाहन
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मागील अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत असलेल्या मोटारसायकल वाहनाचा लिलाव प्रस्तावित असून येत्या 15 दिवसात आत संबंधितांनी वाहनाचे कागदपत्रे आणून वाहन ताब्यात घ्यावे असे आवाहन मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांनी केले आहे.
वेगवेगळ्या कारणाने मागील अनेक वर्षापासून मोटारसायकल वाहन खितपत पडलेले आहेत मात्र याचा वाली आजतागायत आले नसल्याने हे वाहन धूळखात आहे. संबंधितांनी आपले वाहन ओळखून व वाहनाचे मूळ कागदपत्रे आणून घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
परिणामी , सदर वाहनाचे मूळ मालक कागदपत्रे सह आल्यास हे वाहन प्रशासकीय अटींची पूर्तता करून ताब्यात देण्यात येणार आहे. अन्यथा या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.तशा आशयाची तारीख निश्चित करण्यात येईल.
दरम्यान , या वाहनात फॅशन क्रमांक 1668 , स्टार सिटी 6682 , फॅशन हिरो होंडा 3823 , स्प्लेन्डर 3704 , 5868 , कावासाकी 4869 , टिव्हीएस व्हिक्टर 8455 , बजाज बॉक्सर 7438 , पॅशन 3808 , पॅशन प्रो 1049 , स्प्लेडंर 2512 , ऍक्टिवा 2176 , सुझुकी , अपाची व बजाज स्कुटर याचा समावेश आहे.
या बेवारस स्थितीतील वाहनांच्या मालकांनी मूळ कागदपत्रे आणून आपला मालकी हक्क सिध्द करावा अन्यथा लिलाल प्रस्तावित असल्याचे ठाणेदार राजेश पुरी यांनी सूतोवाच केले.