मारेगाव पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी मोहीम

– ठाणेदार राजेश पुरी यांनी केले दुष्परिणाम व व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त (दि.26) ला मारेगाव पोलिसांकडून शहर व तालुक्यातील मुख्य गावात अंमली पदार्थांच्या दुष्परिणाम बाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.

 

26 जून हा जागतिक अंमली पदार्थ दिन म्हणून साजरा करण्यात येतो.अंमली पदार्थाचे सेवन एखाद्या च्या शारीरिक व मानसिक आजारावर कसे दुष्परिणाम करते याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो.

 

मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत परिसरात व शहरातील मुख्य चौकात पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड , उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार राजेश पुरी व त्यांच्या पथकांनी ही मोहीम राबविली.

अंमली पदार्थाच्या सेवनाने एखाद्याचे आयुष्य कसे बिघडू शकते.ड्रग्ज आणि त्याच्या दुष्परिणाम यावर यथोचित मार्गदर्शन ठाणेदार राजेश पुरी यांनी मारेगाव चौकात केले.

 

अंमली पदार्थ हे आरोग्यासाठी हानिकारक असून यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकांकडून कारवाई केली जाते.मात्र केवळ कारवाईचा बडगाच उगारला जात नाही तर या मोहिमेत जनजागृती वर भर दिला जाणार आहे.विविध भागात प्रामुख्याने महाविद्यालयात मोहीम सुरू करण्याचा मनोदय आहे.

   श्री राजेश पुरी, ठाणेदार

   पोलिस स्टेशन , मारेगाव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment