संवेदना… चिंचमंडळचे पोलीस पाटील पचारे यांचे निधन

– भयाण आजाराशी गेल्या तीन महिन्यापासूनची झुंज अखेर संपली

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील पोलीस पाटील परशराम नारायण पचारे यांचे आज रविवारला सकाळी 10.20 वाजता स्वगृही दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 44 होते.

पोलीस प्रशासनाचा दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील पदावर मागील 16 वर्षांपासून कार्यरत होते. प्रशासनाचे पारदर्शक कारकीर्द जोपासणारे परशराम पचारे यांना मागील तीन महिन्यापासून अन्ननलीकेच्या कर्करोगाने ग्रासले होते.

नागपूर – मेघे सावंगी येथे त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असतांना आज चिंचमंडळ निवासी त्यांची प्राणज्योत मालविली.त्यांच्या पश्चात आई , पत्नी व दोन मुले आहेत.

आज सायंकाळी 4.30 वाजताचे दरम्यान त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबातील निकटवर्तीयांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment