पैकूजी आत्राम आदिवासी समजभूषण पुरस्काराने सन्मानित

– नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत पुरस्कार प्रदान

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

पैकूजी आत्राम हे आदिवासींच्या सामाजिक ,कला व साहित्य क्षेत्रात नेहमी उल्लेखनिय कार्य करीत असतात.त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना आदिवासी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

कोलामी भाषीक विध्यार्थ्यांच्या प्रगती साठी कोलामी भाषेतून विविध शैक्षणिक साधने ,उपक्रम व लेखन करीत असतात.त्यांनी कोलामी भाषीक विध्यार्थ्यासाठी कोलामी-मराठी द्विभाषीक पुस्तकांची निर्मीती करून यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी शाळेत वितरीत केलेले आहे.ते कोलामी भाषीक मुलांसासाठी नवनवीन उपक्रम राबवित असतात.नुकतेच त्यांच्या एका उपक्रमाला ‘National Level Teacher Innovation Award’ मिळालेला आहे.

ते आदिम कोलामी भाषेच्या संशोधनासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पूणे येथे कोलामी-मराठी शब्दकोश दिलेला आहे.जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेतील बहूल कोलामी भाषीक विध्यार्थ्यांच्या शाळेतील अनेक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे.तसेच कोलामी भाषेतील बोधप्रद व प्रेरणादायी गीतांची रचना करून आदिवासी प्रबोधन कार्यक्रमात सादर केलेली आहे.

 

या बाबींचा विचार करून वणी येथे दिनांक २४ जून २०२३ ला दुसरे नवोदित आदिवासी साहित्य परीषदेत त्यांचा ‘आदिवासी समाज भुषण पुरस्कार’ साहित्य परिषदेच्या अध्यक्षा साहित्यीक व विचारवंत आ.कुसूम अलाम यांच्या हस्ते पैकूजी आत्राम यांना प्रदान करण्यात आला.या प्रसंगी श्री.प्रभु राजगडकर,सौ.उषाकिरण आत्राम,श्री.दशरत मडावी,श्री.वसंत कनाके व सौ.शितल ढगे इत्यादी साहित्यीक व विचारवंत उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment