मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील युवकाने नागपूर येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारला उघडकीस आली.
सौरभ सुभाष मंजेकार असे गळफास घेऊन जीवनयात्रा संपविलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
तो मागील अनेक महिन्यापासून रोजगाराच्या शोधात नागपूर येथे गेला होता.दरम्यान एका कंपनीत कार्यरत असतांना त्याने भाड्याची खोली केली होती.आज सकाळी भाड्याच्या खोलीतच गळफास घेत जीवनाचा अखेर केला.
आत्महत्येचे नेमके कारण तूर्तास अस्पष्ट आहे.मृतक सौरभ याचा मृतदेह नरसाळा कडे आणण्यात येत आहे.त्याच्या पश्चात आई , वडील , आजी ,आजोबा , दोन भाऊ असा आप्तपरिवार आहे.