– दोन सख्ख्या भावा सह त्यांच्या अर्धांगिनी ठार
– घुगूस जवळ बोलेरो दुभाजकावर आदळून ट्रकला जबर धडक
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव येथील दोन भावंडे आपल्या अर्धांगिनी सोबत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून परत येत असतांना घुगूस जवळ बोलेरो वाहन दुभाजका वर जाऊन उभ्या ट्रक ला जबर धडकली. या भीषण अपघातात मारेगाव येथील चौघे जन जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारला दुपारी 2 वाजता चे दरम्यान घडली.या धक्कादायक घटनेने मारेगाव शोक सागरात बुडाला आहे.
रफीक नबी वस्ताद शेख , पत्नी संजिदा रफीक शेख , युसूफ नबी वस्ताद शेख, पत्नी मुमताज युसूफ शेख रा.मारेगाव असे अपघातात ठार झालेल्या दोन भावंड व त्याच्या पत्नीचे नाव आहे.
हे कुटुंब काल गुरुवार ला आपल्या नातेवाईकांच्या साक्षगंधाला राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे गेले होते.मारेगाव कडे बोलेरो क्रमांक एम.एच.29 बी. सी . 6321 ने परतीचा प्रवास सुरु असतांना घुगूस नजीक हे वाहन दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या ट्रकला जबर धडक दिली.या भयाण अपघातात बोलेरो वाहनाचा चक्काचूर होऊन यातील मारेगावचे दोन सख्ख्ये भाऊ व त्यांच्या पत्नी जागीच ठार झाले.
अपघात एवढा भयावह होता की वाहनाचे प्रत्येक भाग गॅस कटरने कापून मृतकांना बाहेर काढण्याचे नियोजन सुरू आहे.दरम्यान मृतक थोरला भाऊ रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे तर लहान भाऊ युसूफ शेख याच्या पश्चात दोन मुली आहे.
दरम्यान या दुर्देवी घटनेने मारेगावात धिरगंभीर प्रतिक्रिया उमटत हळहळ व्यक्त होत आहे.