– मृतक मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील
– अतिमद्य प्राशनाने मृत्यू झाल्याची साशंकता
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव राज्य महामार्गाच्या कडेला आज गुरुवार ला दुपारच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.मृतदेह हा गेल्या दोन दिवसांपासून असल्याचा अंदाज व्यक्त होत असून अति मद्य प्राशन केल्याने मृत्यू झाला असावा अशीही साशंकता व्यक्त होत आहे.
मारेगाव राज्य महामार्ग असलेल्या नियोजित लोढा हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या काटेरी झुडपात मृतदेह निदर्शनास आला.
सदर इसम दोन दिवसांपासून अति मद्य प्राशन करून अनेकांच्या निदर्शनास आला होता.आज दुपारी मृतदेह आढळून आल्याने बघ्यांची तोबा गर्दी उसळली.सदर मृतक मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील पंजाब आत्राम असल्याचे कळते.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.