Breaking News

एक वाळू तस्कर ट्रॅक्टरसह महसुलच्या कवेत

– चिंचमंडळ येथे पथकाची धडक कारवाई
– तब्बल नऊ ट्रॅक्टरवरील कारवाई थोडक्यात हुकली

मारेगाव : दीपक डोहणे

वर्धा नदीवर वाळू तस्करांनी उंच्छाद मांडून प्रशासनास हातघाईस आणणाऱ्या तब्बल दहा ट्रॅक्टरवरील कारवाई थोडक्यात हुकली.एक वाळू भरलेला ट्रॅक्टर घटनास्थळी सापडताच महसूल पथकाने ताब्यात घेतले.ही कारवाई मंगळवारच्या मध्यरात्री करण्यात आली.मात्र या कारवाईत तब्बल नऊ ट्रॅक्टर पोबारा करण्यात यशस्वी ठरले.नविन तहसीलदार यांच्या व्युव्हरचनेने तस्करांचे पुरते धाबे दणाणले आहे.

मारेगाव तालुक्यातील सीमेवर असलेल्या वर्धा नदीतून वाळूची तस्करी नविन नाही.तस्करांनी आपल्या सवंगडींना लोकेशनवर ठेवून शासनाच्या महसूलला चुना लावण्याचा गोरखधंदा राजरोसपणे चालतोय.

चिंचमंडळ समोरील वर्धा नदीवर मंगळवारच्या मध्यरात्री तब्बल दहा ट्रॅक्टर ने प्रवेश केला.ही वाहने नदी तीरावर जाण्यासाठी दगड , माती , ताटवे टाकण्याची तस्करांनी शक्कल लढवली.

महसूल विभाग तस्करांच्या टप्प्यावर असतांना तहसीलदार निलावाड यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार अरुण भगत , मंडळ अधिकारी अमोल गुगाणे , तलाठी शिंदे यांचे पथक दाखल झाले.मात्र महसूल विभागाच्या वाहनाच्या प्रकाशाचा अंदाज येताच तस्करांनी वाहनासह पळ काढला यात तब्बल नऊ वाहने पोबारा करण्यात यशस्वी ठरले असले तरी चिंचमंडळ येथील संतोष चिन्हे या वाळू तस्करांचे वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात महसूल विभागास यश आले.

काही दिवसांपूर्वीच रुजू झालेल्या तहसीलदार यांच्या नियोजनबद्ध व नायब तहसीलदार अरुण भगत यांचे पथकाच्या व्युव्हरचनेने वाळू तस्करांचे पुरते धाबे दणाणले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment