Breaking News

दामिनीसाठी वाट्टेल ते… मारेगाव तालुक्यातील नागरिक धडकले मध्यरात्री वीज कंपनीवर

लेखी आश्वासनानंतर अघोषित आंदोलन मागे

मारेगाव : दीपक डोहणे

तापमानात कमालीची वाढ , असह्य उकाडा , डासांचा प्रादुर्भाव आणि सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे जबर शॉक बसून कमालीचे वैतागलेल्या तालुक्यातील नागरिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयावर शनिवार च्या मध्यरात्री धडक दिली. वीज पुरवठा कायम पूर्ववत करण्यासाठी अघोषीत आंदोलन करीत खळबळ उडवून दिली.भांबावलेल्या अधिकाऱ्यांनी अखेर मध्यरात्री 2 वाजता लेखी आश्वासानंतर वीज पुरवठा पूर्ववत सुरू करीत आंदोलन मागे घेण्यात आले.

मारेगाव तालुक्यात मागील काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला होता.दिवस असो की रात्र वीज खंडीत होणे हे तालुक्यातील नागरिकांना शाप की वरदान याबाबत साशंकता पसरली होती.किंबहुना शहरासह ग्रामीण भागातील जनतेत कंपनीप्रती कमालीचा संताप व्यक्त होत होता.

ग्रामीण भागात मागील एप्रिल पासून खंडीत वीज पुरवठ्याची मालीकाच सुरू आहे.शेतीचे सिंचन , पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न आणि नागरिकांची होत असलेली कुचंबणा यामुळे पिसगाव , पांढरकवडा , पहापळ , डोर्ली , टाकरखेडा , कोलगाव , वेगाव येथील नागरीक शनिवारच्या मध्यरात्री वीज कंपनीवर धडकले.मारेगाव येथीलही लपंडाव कायम असतांना रात्री अकरा वाजता वीज गुल होवून तब्बल तीन तास वीज पुरवठा खंडीत झाला.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दिमतीला मारेगावकरही वीज कंपनीत धडकले.

नागरिकांची होत असलेली काहिली , सततच्या खंडीत वीज पुरवठ्याने उडालेली झोप आणि सिंचन , पशुधनाच्या प्रश्नावर वीज अधिकाऱ्यांना शेकडो नागरिकांनी नानाविध प्रश्नांची सरबत्ती करीत मध्यरात्री अघोषित आंदोलन केले.अखेर ग्रामीण आणि मारेगावचा विद्युत पुरवठा खंडीत होणार नसल्याचे लेखी आश्वासानंतर अघोषित आंदोलन मागे घेण्यात आले.परिणामी मध्यरात्री 2 वाजता सुरू झालेला वीजपुरवठा तूर्तास कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment