–मारेगावातील घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 11 मधील युवकाने स्वतःचे निवासी गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज गुरुवारला सकाळी उघडकीस आली.
शंकर कवडू गजबे (27) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.धामणी रोड वर वास्तव्यात असलेल्या स्वगृही गळफास घेत जीवनाचा अखेर केला.
दरम्यान , शंकर हा धामणी रोड च्या कडेला पानटपरी चा व्यवसाय करायचा.सुगीचे आयुष्य जगत असतांना शंकरच्या टोकाच्या निर्णयाचे नेमके कारण तूर्तास अस्पष्ट आहे. मृतकाच्या पश्चात आईवडील , दोन भाऊ , एक बहीण असा आप्तपरिवार आहे.