Breaking News

मारेगाव येथे बेरोजगारांकरिता संगणकाचे मोफत प्रशिक्षण

-जिल्हा प्रकल्प विभागाचे आयोजन

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील बेरोजगार युवक युवती करिता मोफत संगणकाचे डीटीपी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर योजनेचा लाभ अनुसूचित जमाती प्रवर्गतील बेरोजगारांना होणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना स्टाइपन सुद्धा दिले जाणार आहे. हे विशेष
तालुक्यातील आदिवासी समाजातील बेरोजगार युवक युती करिता महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळातर्फे हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षनामध्ये सहभागी बेरोजगारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याकरिता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आधार कार्ड मार्कशीट बँक पासबुक तीन फोटो अशी कागदपत्रे लागणार आहेत. 18 ते 45 वय वर्ष असणाऱ्या अनुसूचित जमात प्रवर्गातील बेरोजगारानी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी रुपेश हीरूरकर सह तालुका आयोजक कैलास दुधकोहल यांनी केले आहे. जा बेरोजगाराना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 8806721133 नंबर संपर्क करावा असे आवाहन तालुका आयोजक तर्फे करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment