-पाचशे नागरिकांना विविध दाखले प्रदान
मारेगांव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यांतील सिंधी( महागाव )येथे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिबीर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी पाचशे नागरिकांना विविध दाखले प्रदान करण्यात आले तर आरोग्य विभागाच्या वतीने 108 लोकांची आरोग्य तपासणी व औषध उपचार केले.
शासकीय कार्यालयात नागरिकांची होणारी परवड थांबावी. नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणचे हेलपाटे थांबावे या हेतूने मारेगाव तालुका प्रशासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत शिबिर शिंदी (महागाव )येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये केवायसी ,निराधार योजना ,उत्पन्नाचे दाखले ,श्रम कार्ड ,पीएम किसान नोंदणी सह आदी विभागातील विविध दाखले तात्काळ देण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार केले. यावेळी मंडळ अधिकारी आर. डी .कडारकर, सरपंच नीलिमा थेरे, उपसरपंच अविनाश लांबट, डॉ. बोडी जूनघरी, डॉ. प्रतीक्षा सातारकर, तलाठी चिकनकर, तलाठी वानखेडे, परिचारिका सीमा वरधे,एस.डी आत्राम आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रदीप डाहुले, पोलीस पाटील संतोष निब्रड, दिनेश गेडाम, वंदना बोंडे, माया लेनगुरे, सविता न्याहारे, उत्तम आत्राम, प्रभाकर चांदेकर ,दिलीप परचाके ,गणपत ढवस, राहुल पोतराजे आदींनी सहकार्य केले.