– सिंधी ( महागाव) येथील घटना
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील सिंधी (महागाव) येथील एका युवा शेतकरी पुत्राने विषारी औषध प्राशन केले. सदर युवा शेतकरी पुत्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
विजय नानाजी खंडाळकर वय 42 ( अंदाजे) रा. सिंधी (महागाव) असे मृतक युवा शेतकरी पुत्राचे नाव आहे. तो आज पहाटे घरून घराबाहेर गेला. यादरम्यान तो गावाशेजारी असलेल्या महागाव तलाव रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडला होता.
सकाळी शेतीची कामे करण्यात करता जाणाऱ्या शेतकरी शेतमजुरांना तो दिसला. त्यानी त्याला तात्काळ उपचारार्थ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे वयोवृद्ध वडील पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलीस करित आहे.