– वरोरा रेल्वे ट्रॅक वर आढळला मृतदेह
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
येथील सलून व्यवसायिक विठ्ठलराव शेटे (61) रा.इंदिरा नगर मारेगाव यांचा वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळल्याचे धक्कादायक वृत्त आहे.दरम्यान आज सकाळी समाज माध्यमातून व वृत्तपत्रातुन मिळालेल्या माहितीवरून गंणगोतांनी वरोरा येथील घटनास्थळ गाठले आहे.
विठ्ठलराव शेटे गत 40 वर्षांपासून सलून व्यावसायिक होते.मागील मंगळवारला ते नातेवाईकांकडे जातोय म्हणून मारेगाव वरून वरोरा येथे निघाले.मात्र ते नातेवाईक कडे पोहचलेच नाही.
दरम्यान त्यांचा मृतदेह बुधवार ला वरोरा येथील रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उडाली.चंद्रपूर जिल्हयातील काही वृत्तपत्रे व समाज माध्यमावर मृत्यूचे वृत्त झळकत असतांना आज सकाळी मारेगाव येथील कुटुंबियांना ही वेदनादायक घटना निदर्शनास आली.
विठ्ठलराव शेटे यांच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे.नातेवाईक सोडून ते रेल्वे ट्रॅक कडे कशासाठी गेले ? अपघात की आत्महत्या ? आदी प्रश्न तूर्तास गुलदस्त्यात आहे.घटनेची माहिती कळताच येथील नातेवाईकांनी वरोरा गाठले असून मृतदेह मारेगावला आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.मृतकाच्या पश्चात पत्नी , तीन मुली , एक मुलगा , नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.