– मारेगावात ओस पडले कृषी केन्द्र
मारेगाव : दीपक डोहणे
अवघ्या दिवसांवर आलेल्या मृग नक्षत्रात पेरणी व्हावी अशी बहुतांश शेतकऱ्यांची तयारी असते.त्यासाठी बियाणे खरेदीची लगबग वाढली असतांना मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी बियानाचा दर्जा व किमतीची घसरण पाहून लगतच्या परराज्यात खरेदी केली.तालुक्यातील किमान 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांचा कल तेलंगणा राज्यात असल्याने मारेगाव येथील कृषी केंद्र ओस पडल्यागत सदृश चित्र आहे.
मारेगाव तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतीच्या उत्पादनावर कायम भर असते.अशातच पेरणीची लगबग उंबरठ्यावर असल्याने मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्याचा आसरा घेतला आहे.येथील बियाणे टोबणी केल्यास रोग नियंत्रणात व उगवण शक्ती मोठ्याप्रमाणावर आणि उत्पादनात सरस ठरत असल्याचा कयास येथील शेतकरी व्यक्त करीत आहे.तेलंगणा राज्यातील SCH 616 – CCH 999 – पांडुरंग – मीनाक्षी – कुबेर – धनदेव – धर्मा बैलजोडी यासह विविध कंपनीच्या बियाणांची कमालीची मागणी वाढली आहे.
परिणामी , मागील अनेक वर्षांपासून जवळपास कृषी केंद्र संचालकांनी बियाणे उधारी बंद केली.काही वर्षांपासून निसर्गाचा समतोल बिघडून कपाशीच्या उत्पनावर विपरित परिणाम हाही उधारी बंद चा पायंडा रचल्याचे शेतकऱ्यांत बोलले जाते. मारेगाव तालुक्यात गोल्ड कॉट , राशी 659 , सुपर कॉट , मनी मेकर , धमाका , AXC प्रवर्धन , जंगी , धनदेव, नवनीत , आशा , साकेत , हरिष यासह वेगवेगळ्या व्हेरायट्या विकली जातात. त्याच त्या व्हेरायट्या व कपाशी दरफलकातही फरकाने तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यातील आदीलाबाद , बेला येथून कपाशीचे बियाणे खरेदी करण्यासाठी वाट धरली.
येथील कृषी केंद्र संचालकांनी निवडक शेतकऱ्यांनाच काही प्रमाणात उधारीचे जाळे विणले.त्यामुळेही बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी आणि दरात असलेल्या तफावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांचा परप्रांतात कल वाढला.याचा जबरदस्त फटका येथील कृषी केंद्रांना बसत असल्याचे ऐन बियाणे खरेदीसाठी लगबगीच्या दिवसात मारेगाव तालुक्यातील बहुतेक कृषी केंद्रास किमान 70 ते 80 टक्के ग्राहकांचा जबर फटका बसला आहे.
व्हेरायटीवरील गुणधर्म जवळपास सारखाच आहे.शेतकऱ्यांच्या मनातील अनेक व्हेरायटीची उपलब्धता नसल्याने आणि शेतकऱ्यांचा स्वेच्छेचा प्रश्न असल्याने परप्रांतात कल वाढला आहे.
एस.के.निकाळजे
तालुका कृषी अधिकारी, मारेगाव
शासनाने १ जून पासून बियाणांची विक्री करण्याचे सूतोवाच केले मात्र नियम व अटींची पायमल्ली झाली.इकडे नेहमीच्या व्हेरायट्या असल्याने परराज्यात शेतकऱ्यांचा कल वाढला.शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर पाठ फिरवली आणि आंध्रप्रदेश , तेलंगणा राज्यात धाव घेतली या भयाण वास्तवाचा कृषी केंद्रास किमान 80 टक्के फटका बसला आहे.
–युनुस शेख
संचालक- बाँबेवाला कृषी केंद्र,मारेगाव
शेतजमिनीलाही वेगळा बदल आणि बियानातील परिवर्तन हा उत्पादन वाढीचा उहापोह कृतीत उतरविण्याचा काही शेतकऱ्यांचा मनोदय म्हणून आम्ही तेलंगणा राज्यातून बियाणे आणले.येणाऱ्या दिवसात प्रामुख्याने कमी खर्चात उत्पादनात कमालीची वाढ दिसेल याच अपेक्षा आहे
-रामकीसन मेश्राम
शेतकरी, भालेवाडी