Breaking News

जागतिक सायकल दिन… न्यायालय तर्फे सायकल रॅली

मारेगावात रॅलीला उदंड प्रतिसाद

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

आज जागतिक सायकल दिनानिमित्त मारेगाव न्यायालय तर्फे पाच किलोमीटर सायकल रॅली काढण्यात आली. वाहनांमुळे प्रदूषण व आरोग्य बिघडत असल्याचे सर्वत्र दिसत आहे. सायकल चालविण्याचे महत्त्व आणि फायदे आता मानवाला कळत आहे. यामुळे दरवर्षी तीन जून ला जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात येतो. यानिमीत्ताने मारेगाव न्यायालय तर्फे आज सायकल रॅली काढण्यात आली.

रॅली मध्ये कर्मचारी वर्ग, वकील मंडळी, पोलीस बंधू, पत्रकार व विधी स्वंयसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.प्रारंभी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश प्रभाकर वासाडे यांनी सायकल चालविण्याचे महत्त्व सांगितले. ते दररोज सात किलोमिटर सायकल चालवत असून सर्वांनी सायकल चालविण्याची आरोग्यदायी सवय आत्मसात करावी असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

यानंतर न्यायालय ते मांगरूळ गाव पर्यंत जाऊन ही रॅली परत न्यायालय मध्ये आली. रॅलीत जनजागृतीच्या घोषणा देण्यात आल्या.या रॅली मध्ये मारेगाव न्यायालय चे न्यायाधिश निलेश प्रभाकर वासाडे, अँड. मेहमूद पठाण, अँड.करिश्मा किन्हेकार,अँड. रुनाली गाणार, अँड.मेघा कोडपे ,अँड.काजल शेख, कर्मचारी पांडुरंग वासाड, सूरज टेंभरे, प्रणय बूजाडे, जोतिबा पोटे,अशोक कोरडे, नागेश रायपुरे, विधी स्वंयसेवक विवेक बोबडे,राजू घुमे, पोलीस जमादार नितीन खांदवे, ताजने, शंकर बारेकर,
शिपाई पवन राऊत, मोसिम शेख, नंदू झोडे, मोरेश्वर कणकुंटवार,चेतन गेडाम यांनी सहभाग घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment