Breaking News

एक्झिट…खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

– पक्ष – कार्यकर्त्यांत शोककळा

– आज पहाटे घेतला अखेरचा श्वास

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर (48) यांचे दिल्ली स्थित उपचारादरम्यान आज पहाटे 3 वाजताचे दुःखद निधन झाले.खा.धानोरकर यांच्या एक्झिटने राजकीय क्षेत्रात पुरती शोककळा पसरली आहे.

 

सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून बाळू धानोरकर विजयी झाले होते.ते महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार होते.

खा.बाळू धानोरकर यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे गत 27 मे रोजी निधन झाले या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी खा.बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना नागपूर येथील अरिहंत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

मात्र प्रकृतीत सुधारणा नसल्याने त्यांना दिल्ली येथील वेदांत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.येथेही प्रकृती प्रतिसाद देत नसल्याने दिल्लीतीलच एम्स रुग्णालयात दाखल केले.प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असता खा.बाळू धानोरकर यांची मंगळवारला पहाटे 3 वाजताचे सुमारास प्राणज्योत मालविली.

 

खा.धानोरकर यांच्या शरीरातील व्हायरसने अनेक प्रकारचे अवयव निकामी केल्याने त्यांची एक्झिट लाखो कार्यकर्त्यांना पोरके करून गेली.परिणामी बाळूभाऊच्या वेदनादायी घटनेने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.खा.बाळू धानोरकर यांचे पार्थिव आज दुपारी 2 वाजता वरोरा येथे आणण्यात येणार आहे.4 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर खा.बाळूभाऊ यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

 

त्यांच्या पश्चात आई वच्छलाबाई , पत्नी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर , थोरला चिरंजीव मानस व लहान पार्थ , एक भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment