Breaking News

भरारी… मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलीचे JEE B arch मध्ये दैदिप्यमान यश

– कु.प्रणाली विजय ढवस JEE B arch परीक्षेत 99.73 % टक्के घेऊन देशातुन 47 वा नंबर.

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील मुकटा येथील कु.प्रणाली विजय ढवस हिने JEE B arch परीक्षेत 99.73 % टाईल घेऊन देशातुन 47 वा नंबर प्राप्त करून गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

कु.प्रणाली ही आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे 12 व्या वर्गात विज्ञान शाखेत मागील वर्षी शिकत होती.तीला 86.83% मार्क होते.तिचा कॉलेज मधुन 3 रा नंबर होता.तिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथे झाले.

तालुक्यातील मुकटा येथील शेतकऱ्यांच्या मुलीने JEE B arch परीक्षेत घेतलेली ही भरारी कौतुकास्पद ठरत आहे.आई-वडील शेतकरी असून त्यांचे कडे 7 एकर शेती आहे.घरात कुणीही जास्त प्रमाणात सुशिक्षित नसतांना दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या प्रणाली चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.प्रणाली हे श्रेय आई वडीला सह आजी आजोबांना व महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक यांना देत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment