Breaking News

बोटोणीच्या नारीशक्तींनी अवैध दारू पकडली

– विक्रेत्याचा घटस्थळावरून पोबारा 

बोटोणी : सुनील उताणे

तालुक्यातील बोटोणी येथे अवैध व्यवसायात कमालीची वाढ होऊन सामाजिक स्वास्थ्यास प्रचंड धोका निर्माण होत आहे.अवैध दारू विक्रीने उच्चांक गाठीत वैतागलेल्या महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले.प्रशासनही लागलीच गावात आले मात्र पोलिसांचे वाहन माघारी फिरताच दारूची विक्री सुरू झाली.येथील नारीशक्तीनेच छापा टाकून शेकडो बाटल्या हस्तगत करीत गुरुवार ला दुपारी पोलिसांच्या स्वाधीन केल्याने येथील महिला कौतुकास पात्र ठरत आहे.मात्र धरपकडीत व्यवसायधारक सुरेश पायलवार याने घटनास्थळावरून पोबारा केला.

बोटोणी येथील मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारूची खुलेआम विक्री सुरू आहे.त्यामुळे युवा वर्ग पुर्णतः व्यसनाच्या आहारी जात अनेक कुटुंबात कलहाचे वातावरण नित्याचे झाले आहे.किंबहुना सामाजीक स्वास्थ्यास प्रचंड तडा जात असल्याने वैतागलेल्या महिलांनी माजी पं. स.सदस्य सुनीता लालसरे व सरपंच सुनीता जुमनाके यांच्या नेतृत्वात पोलीसात तक्रार दाखल केली.

तक्रारीची इत्यंभूत माहिती असलेल्या अवैध व्यवसायधारकाने मुजोरीचा आलेख कायम ठेवत दारू विक्री सुरूच ठेवली. येथील सविता मत्ते , वैशाली गाणफाडे , वेणूताई , किरण तुरणकार , सरिता मत्ते , वनिता सिडाम , सुरेखा मिंदेवार , रंजणा दोडेवार , लिलाबाई किनाके , लक्ष्मीबाई झिंगरे या नारीशक्ती एकवटून त्याचे थेट घर गाठत अवैध दारूवर छापा टाकीत पोलिसांच्या स्वाधीन केले.यावेळी व्यावसायिकाने घटस्थळावरून पोबारा केला असला तरी यापुढे असा प्रकार निदर्शनास आला तर खैर करणार नसल्याचा नारीशक्तीने एल्गार पुकारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment