Breaking News

रिना आत्महत्या प्रकरण… अखेर सासू ,सासरे व पतीवर गुन्हे दाखल

– आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील रिना हिने मानसिक छळाला कंटाळून 20 मे रोजी घरातच गळफास लावून आत्महत्या केली.याबाबतची तक्रार मृतक रिनाच्या आईने पोलिसात दिली.आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे मृतकचे पती व सासू सासरे यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले.

गोंडबुरांडा येथील रिना हिचा प्रेमविवाह मागील वर्षभरापूर्वी झाला होता.मात्र येथे तिची जात आडवी येत सासू सासरे प्रचंड मानसिक छळ करीत होते नव्हेतर पतीलाही रिना ही नकोशी झाली होती.नेहमीच्या जाचाला कंटाळून अखेर रिनाने गळफास घेत जीवनाचा अखेर केला यावेळी ती चार महिन्याची गर्भवती होती.असे तक्रारीत नमूद करण्यात आले.

तक्रारीवरून मृतक रिना चा पती सुनील भाऊराव मुसळे , सासरे भाऊराव मुसळे व सासू अंजना मुसळे यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment