Breaking News

रिना आत्महत्या प्रकरण.. मारेगावात नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार

– अटकेची मागणी : पोलिसांच्या भूमिकेने निवळला तणाव

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

सासरकडील सततच्या वादाची ठिणगी असह्य झाल्यानेच माझ्या मुलीने गळफास घेतला. मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी मृतक रिना चे वडिल व नातेवाईकांनी करीत शवविच्छेदना नंतर मृतदेह घेण्यास नकार दिला. काहीवेळ तणाव सदृष स्थिती मारेगाव रुग्णालयात निर्माण झाली.मात्र पोलीस उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत यांनी सकारात्मक भूमिका वटवित तणाव निवळला.तब्बल दोन तासानंतर मृतदेह गोंडबुरांडा येथे हलविण्यात आला.

मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील सुनील मुसळे यांनी रिना सोबत आंतरजातीय प्रेमविवाह मागील एक वर्षाच्या कालावधीत केला होता.रिनाच्या पोटातील पाच महिन्याचे अंकुराची वाढ होत असतांना शनिवारी दुपारी चार वाजताचे सुमारास गोंडबुरांडा स्थित घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याने वेगवेगळ्या चर्चेला प्रचंड उधाण आले आहे.

दरम्यान , रिनाचा मृतदेहावर मारेगाव ग्रामीण रुग्णालयात रविवारला शवविच्छेदन करण्यात आले.रिनाच्या आत्महत्येस सासर कडील मंडळी जबाबदार असल्याचा ठपका ठेवत प्रचंड संताप व्यक्त होत होता.सासर कडील मंडळींना यावेळी शिव्यांची लाखोळीही वाहण्यात आली. तरुण मुलीच्या आत्महत्येची सल कायम असतांना मात्र सासर कडील मंडळींनी सुरक्षित अंतर ठेवण्यात धन्यता मानल्याचे चित्र यावेळी बघावयास मिळाले.

परिणामी , मृतदेहाचे शवविच्छेदन होताच वडील व नातेवाईकांनी मृतदेह घेण्यासाठी नकार देत आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी लावून धरली.यावेळी काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.रिनाला सातत्याने सासरच्या वरिष्ठांकडून असह्य त्रास असल्याचा आरोप यावेळी करण्यात येत होता.

उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत यांनी दोन्ही बाजूकडील नातेवाईकांना सकारात्मक भूमिका वटवित तणाव सदृष स्थिती शांततेत वळविला आणि तणाव निवळत प्रेत मृतक विवाहित मुलीच्या नातेवाईक यांचेकडे सोपविला.धिरगंभीर प्रकरणातील नवविवाहित गर्भवती मुलीचे शव तब्बल दोन तासानंतर गोंडबुरांडा कडे कूच केले.

आंतरजातीय प्रेम विवाहाच्या अकाली टोकाच्या निर्णयाच्या वेगवेगळ्या चर्चेचे रहस्य गडद होत आहे.रिना ही जातीय व्यवस्थेची बळी तर ठरली नाही ना ? हे आगामी दिवसात आत्महत्येची कारणेमिमांसा स्पष्ट करणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment