– मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील घटनेने गावात शोककळा
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
वर्षाभरापूर्वी विवाहबद्ध झालेल्या नवविवाहीत महिलेने स्वगृही गळफास घेऊन जिवनयात्रा संपविल्याची घटना आज शनिवारला सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली.विवाहित महिलेच्या टोकाच्या निर्णयाने गावात पुरती शोककळा पसरली आहे.
रिना सुनील मुसळे (20) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुण महिलेचे नाव आहे.वर्षभरापूर्वी गावातच सुनील नामक युवकाशी प्रेमविवाह केला होता.यादरम्यान ती चार महिन्याची गरोदर असल्याची माहिती आहे.
आज सासरी असतांना रिना हिने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.तूर्तास आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.मात्र या दुर्देवी घटनेने गोंडबुरांडा येथे शोककळा पसरली आहे.