– वसंत ऋतूची चाहूल : ग्रामीण भागात नटली वनराई
दीपक डोहणे – मारेगाव
पानझडीचा उत्तरार्ध होताच वसंत ऋतूची चाहूल लागली. मारेगाव तालुक्यातील काही भागात वनराई सजून नटलेला येजा करणाऱ्यांना भुरळ पाडते आहे. भर कडाक्याच्या तप्त उन्हात निसर्ग आपलं नवं रुप कसं धारण करू शकतो व येणाऱ्या ऋतुच्या स्वागतासाठी उतावीळ असतो.यावरूनच निसर्गाची महानता दिसून येते.’बहावा’ असाच हा वृक्ष सोनेरी बहरून गर्द पिवळ व शीतल रूप सर्वांना आकर्षित करीत आहे.किंबहुना ग्रामीण भागात प्रामुख्याने रस्त्याने नटलेला हा बहावा वृक्ष वनराईत व ओसाड रानात भुरळ घालतो आहे.
प्रत्येक ऋतुत निसर्गात वेगवेगळे बदल झालेले पाहावयास मिळते.ग्रीष्म , वर्षा , शरद , हेमंत व शिशिर हे प्रतिवर्षी येणारी ऋतुचक्र.हिरविकंच वृक्षांची पाने कालांतराने पानगळी सुरू होते.यालाच शिशिरचा काळ म्हटल्या जाते.शिशिर ऋतूच्या काळातही एक विलक्षण सौंदर्य दडलेलं असते.परंतु ते टिपण्यासाठी वृक्षावर शतदा प्रेम करावं लागतंय.हीच खरी वसंत ऋतूची मौलिक बाब आहे.
सर्वत्र पानझडी होण्याचे व रखरखत्या उन्हातही दूरवर रानात एखादी वृक्षलता निदर्शनास येते.ही निसर्गाची आघात किमया असून पाऊस नसतांनाही निसर्ग आपलं नवकोरं रूप धारण करते.याच काळात अंगोपांगी बहरणारा जणू काही सोन्याचा मुकुट परिधान केलेला बहावा वृक्ष आपलं पिवळ अन शीतल रूप घेवून भर रस्त्याने ओसाड रानातही सर्वांना आपल्या रंगाने आकर्षित करून भुरळ पाडत आहे.
बहावा वृक्ष याच काळात बहरत असल्याने हा वसंत बहराचा काळ. जणू वसंताच्या आगमनाची चाहूल.सौंदर्याचा परमोच्च काळ आपल्या नैराश्याचे आणि मोसम संपूर्ण आता मनाला उभारी आणणार असल्याचे जणू संकेत हा वृक्ष देत असल्याचा त्याकडे बघताच भास होतो.
तूर्तास हा वृक्ष मारेगाव न्यायालय समोर , बोटोणी – खैरगाव भेदी – सराटी – शिवनाळा – घोंसा – धामणी , मार्डी वरून नांदेपेरा – वेगाव व वणी रोड ने येजा करणाऱ्यांना आपल्या सोनेरी रंगाने भुरळ पाडतो आहे.ग्रामीण भागातही जंगल सदृष ठिकाणी हा वृक्ष नटलेला निदर्शनास येतो.मानवी मनाला भुरळ घालणारा एकदा तरी ‘बहावा’हा वृक्ष प्रत्यक्षात जवळून पहावा अशी वृक्षप्रेमींची किमान अपेक्षा आहे.