– मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथील घटना
– बैलबंडी हाकणारा शेतकरी थोडक्यात बचावला
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
तालुक्यातील चिंचाळा येथील येथील असलेल्या नाल्यातील पाण्यात जिवंत विद्युत तार पडून प्रवाह निर्माण झाला.बैलबंडी नाल्यातून नेत असतांना विद्युत स्पर्शाने अडीच लाख रुपयांची बैलजोडी जागीच ठार झाली तर बैलबंडी हाकणारा शेतकरी सुदैवाने बचावल्याची घटना आज रविवारला सकाळी 11 वाजता घडली.
चिंचाळा येथील गावालगत असलेला नाला आहे.हा नाला ओलांडून अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहे.नाल्यावरून अनेक गावातील व शिवारात विज पुरवठा कार्यान्वित करण्यासाठी तारा जोडण्यात आल्या आहेत.मागील आठवड्यात सोसाट्याच्या वारा व मुसळधार पावसाने पोल आणि विद्युत तारा सैल झाल्या मात्र याकडे संबंधित विभागाचे कायम दुर्लक्ष असल्याने जनावरासह मानवावर जीवघेणे प्रसंग ओढावत असल्याचा प्रसंग आज कृतीत उतरल्याने नागरिकात सबंधीत विभागप्रती प्रचंड संतापाची लाट उसळत आहे.
परिणामी , आज शिवारातून नाला ओलांडून रामकीसन खंडरे हे गावाकडे बैलबंडी घेऊन येत असतांना नाल्यात काही अंतरावर तारा कोसळल्या. त्यामुळे नाल्यातील पाण्यात जिवंत विद्युत प्रवाह आला याची पुसटशी कल्पना नसल्याने बैलबंडी नाल्यात टाकताच बैलजोडीला जबर धक्का बसून चिंचाळा येथील चारुदत्त दातारकर यांच्या मालकीची किमान अडीच लाख रुपये किमतीची बैलजोडी जागीच गतप्राण झाली.
बैलगाडीलाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसला यावर असलेले रामकीसन खंडरे या भयाण संकटात जोडीला वाचविण्यासाठी शर्थीच्या प्रयत्नाला अपयश आले मात्र खंडरे यांनाही विद्युत प्रवाहाचा हलकासा धक्का बसून सुदैवाने जिवीतहानी टळली.
दरम्यान , कंपनीच्या तकलादू धोरणाच्या विरोधात चिंचाळा येथे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शेती हंगाम तोंडावर असतांना आता शेती करावी हा यक्षप्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत देण्यात यावी अशी आर्जव मागणी पिडीत शेतकरी चारूदत्त दातारकर यांनी केली आहे.