Breaking News

वसंत जिनिंग प्रेसिंग मध्ये कामगाराचा हात कटला

 – जनहीतचे गौरीशंकर खुराणा यांचेवर गुन्हा दाखल

मारेगाव : दीपक डोहणे

येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये कार्यरत कामगार युवकाचा एक हात रुईच्या पट्ट्यात गेला,यात त्याचा हात खंद्यापासून तुटून पडला.आणि हा संतापजनक प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न थिटा पडून गौरीशंकर खुराणा यांचेसह सुपरवायझर प्रफुल्ल यांच्यावर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 मारेगाव येथील वसंत जिनिंग अँड प्रेसिंग मध्ये प्रेस हेल्पर राजू विजयवीरसिंग चव्हाण वय 20 वर्ष रा.खेरीया ग्राम पो.डोमरी जी.येटा (उत्तरप्रदेश) येथील कामगार कामाला होता त्यास सलग चोवीसतास राबवून घेण्याचा तक्रारीतून आरोप आहे.भुकेने व्याकुळ,जागरण, अन ढोरासारखे काम यामुळे कोवळ्या युवकाची मनस्थिती कमालीची ढासळून मागील 4 मार्च ला प्रेसींग पट्ट्यात हात जाऊन त्याचा डावा हात खांद्यापासून पुर्णतः कटून पडला. रक्ताच्या थारोळ्यात तो युवक तसाच मदतीची याचना करीत ऑफिस मध्ये धावला.त्याला गुपचूपपणे मारेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. नंतर वणी व तेथून नागपुरात सरकारी दवाखान्यात दाखल केले.या भयंकर अपघाताची माहिती तेंव्हा पोलिसांनी देण्यात आली नाही. मीडिया पासून देखील हा प्रकार दूर ठेवण्यात आला.20 दिवस हा गरीब नवयुवक जन्म – मृत्यूशी झगडत राहिला. मरण वेदनेने हा तरुण विव्हळत राहिला. या कामगाराचा डावा हात कटून पूर्ण निकामी झाला.

 सप्टेंबर 2022 पासून कार्यरत या कामगाराच्या गंभीर अपघाताची कुणालाही कुणकुण लागू दिली नाही. तो बिचारा गरीब आता मदतीची याचना करीत आहे.मात्र संवेदनशीलता हरवून बसलेल्या संबंधितांनी कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप पिडीत युवकाने त्याच्या तक्रारीतून केला आहे.

दरम्यान , अवघ्या 20 वर्षात एका हात कायम गमावून अपंगत्व आणून ठेवलेल्या जिनिंग कंत्राटदार यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित च्या वडिलांना पोलिस अधिक्षक , उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे उंबरठे झिजवावे लागले. त्याच्या आईचे रडून – रडून हाल झाले. गंभीर अपघातास कारणीभूत ठरलेले आणि खूप जनहित जोपासणारे गौरीशंकर खुराणा व सुपरवायझर प्रफुल्ल यांचेवर मारेगाव पोलिसात भांदवी 338 कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment