– युवा उद्योजक मनोज धंदरे यांचे आवाहन
– मारेगाव कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये बी कॉम भाग तीनच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री मनोज धंदरे (युवा उद्योजक, मागरूळ) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे हे होते.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी अविरतपणे मेहनती शिवाय पर्याय नसल्याचे मत डॉ.घरडे यांनी व्यक्त केले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोज धंदरे यांनी विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायाकडे वाटचाल करावी व आत्मनिर्भर व्हावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. तर कार्यक्रमाचे अतिथी म्हणून वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. संतोष गायकवाड होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन नमिता गजभीये तर आभार शिफा खान यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी. कॉम भाग एक आणि दोन च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. डॉ. सोडणार , प्रा. डॉ. कुलकर्णी , प्रा. डॉ. घोडखांदे, प्रा. डॉ. राऊत, प्रा. डॉ. अडसरे, प्रा. डॉ. माकडे सर तसेच बी. कॉम. भाग एक दोन तीन चे विद्यार्थी उपस्थित होते.