Breaking News

अकाली पाऊस अन वादळ… मार्डीत घराचे छत उडाले

– मारेगाव तालुक्यात अनेक घरांची पडझड

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुक्यात अकाली पाऊस अन वादळवाऱ्याचा कहर कायम आहे.बुधवारच्या पहाटे झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने मार्डी येथील दोघांच्या घराचे छत उडाले.नैसर्गिक संकटाने ओढावलेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून अकाली पावसाने अनेक तालुक्याला झोडपले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.मेघगर्जनेसह वादळवारा अन अकाली पाऊसाने रखरखत्या उन्हात गारवा निर्माण केला.

परिणामी, बुधवारच्या पहाटे झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा पिसगावातही घोंघावत होता.मार्डी येथे मुसळधार वादळी पाऊसाने राहुल व रामुजी दादाजी धोपटे यांच्या घराचे छतच उडाले.विजेचा प्रवाह या परिसरारात खंडीत आहे. नागरिकांना असह्य त्रासाला समोर जावे लागत आहे.नुकसान झालेल्या पिडीतांच्या घराचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment