-मारेगावात पोलिसासाठी वाद ठरतेय डोकेदुखी
मारेगाव : कैलास ठेंगणे
तालुक्यांत सद्यस्थितीत सुरू असलेल्या परिस्थितीवर सैराट या चित्रपटाची प्रचिती येत आहे. वयात आलेल्या व अल्पवयीन मुलां-मुलींची पळून जाण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आई-वडील त्या मुला-मुलींना आदर्श नागरिक घडविण्याचे स्वप्न रंगवत असतांना त्यांनी आईवडिलांच्या अपेक्षेवर पाणी फेरून आपल्या प्रियकरासोबत पलायन करुन विवाह केल्याचे छायाचित्र पाठवून आई-वडिलांना जोर का झटका धिरेसे देत असल्याचा घटनांनी पालकांच्या चिंतेत भर घातली आहे. तर दुसरीकडे ही पळवा पळवी पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
अलीकडच्या काळात सर्वच साधने सहजरीत्या उपलब्ध झाल्याने आता कोवळ्या वयातच प्रेमाचे आकर्षण वाटू लागते. आई-वडील आपल्या पाल्यांच्या हव्यासापोटी त्यांना पाहिजे ते साधने उपलब्ध करून देतात. शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडे मोबाईल दिला जातो. त्यामुळे ते मोबाईलच्या माध्यमातून सतत एकमेकाच्या संपर्कात राहतात. त्यातूनच त्यांचे प्रेम फुलते. आईवडिलांनी हट्ट पुरविण्यासाठी दिलेल्या मोबाईलचा विपरीत परिणाम होऊन आपले प्रेम फुलविण्यासाठी या मोबाईलचा अधिक वापर होत आहे.
तालुक्यांत प्रेमाचे आमिष देत तरूणींचे लैंगिक शोषण करण्याचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. एक वर्ष दोन वर्ष प्रेमाच्या हाणाभाका घेल्यावर सुशिक्षित तरुणी सुद्धा आई-वडिलांचा विचार न करता सैराट होत आहे.
आपल्यासाठी आई-वडील किती कष्ट सोसतात याची किंचितही कल्पना न करता केवळ आकर्षणापोटी दोन शब्द गोड बोलणाऱ्या मुलाच्या नादी लागतात. आईवडिलांना सोडून त्या मुली प्रियकरासोबत फरार होत आहे.परंतु वडिलांच्या पैशावर प्रेयसीला काही दिवस खूश ठेवणारे मजनूची पोलखोल होताच मुली घरवापशी झाल्याचे ही प्रकार झाले आहे . प्रियकराने प्रमाचे आमिष देऊन त्यांना पळवून नेले. परंतु त्याच्याकडे काहीच आर्थिक उत्पन्न नसल्याने अनेकांनी पळवून नेलेल्या मुलींना सोडून दिल्याचे भयाण वास्तव आहे.किंबहुना यात प्रेमाचा बेरंग करण्यात भ्रमनध्वनी चा आउटपुट मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे.
पालकांनी मुला मुलींशी संवाद वाढवावा. मुलं -मुलीला एकटेपणाची जाणीव होऊ देऊ नये. मुला -मुली सोबत मित्रत्वाची भावना निर्माण करणे आदी मुद्दे तपासामध्ये आढळतात.
आम्ही काहीं प्रकरणांमध्ये समुदेशन करतोय.
-डॉ.ज्ञानेश्वर सावंत
पोलीस उपनिरीक्षक
पो.स्टे मारेगाव.