– सुरक्षेसाठी पोलीसांनी काढली ढाल
– दगडे हातात घेऊन केली अर्धातास दहशत : बघ्यांची तोबा गर्दी
मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क
आज मंगळवार बाजाराचा दिवस..वेळ दुपारची..एका झिंगलेल्या युवकाचा पोलिसात तक्रारीचा आग्रह..त्याची ‘तब्बेत’ पाहून तक्रारीस नकार..अन येथेच त्याच्या संयमाचा बांध सुटतो..बाहेर निघताच हातात अर्धा डझन दगड घेऊन थेट ठाण्यावर भिरकविण्याचा प्रयत्न.. संतापजनक त्याचे शब्द..बघ्यांची तोबा गर्दी ..आणि सुरक्षितता बाळगण्यासाठी काढलेली पोलिसांनी ढाल..हे चित्रपटातील कथानक नव्हे..तर वास्तवात घडलेला प्रकार आज मारेगाव पोलीस ठाण्यासमोर घडला.
मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील युवक मदिरेच्या सेवनाने पुर्णतः झिंगलेल्या अवस्थेत पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेला.मात्र त्याची अवस्था बघून उद्या येण्याचा सल्ला देण्यात आला.ही बाब त्याला अस्वस्थ करू लागली.गेटच्या बाहेर निघत चक्क सहा सात दगड हातात घेत पोलिसांवर भिरकविण्याचा प्रयत्नात शिविगाळ करू लागला.
त्याला पकडण्यासाठी पोलिसांचा आटापिटा सुरू झाला मात्र हातात दगड असल्याने तेवढेच भितीदायक वातावरण तयार झाले.हा प्रकार पाहण्यास शेकडोंच्या गर्दीने हा प्रसंग डोळ्यात साठविला.परिणामी आपल्यावर शेकण्यापूर्वी पोलिसांनी सुरक्षितता जपत ढाल (कठडे) बाहेर काढले.
मात्र अर्धातास तीस वर्षीय युवकाचा दहशत सदृश्य धांगडधिंगा तोबा गर्दीत सुरू असतांना शिताफीने दोघांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.तूर्तास त्याच्या दोन्ही हाताला हातकड्या लावून पोलिसांच्या नजरकैदेत आहे.दिनेश नामदेव आगलावे असे त्याचं नाव आहे.त्याचेवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पोलीस स्टेशन हे सुरक्षतेचं प्रमुख ठिकाण आहे.या पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत असेल तर ही गंभीर बाब आहे.त्याचेवर कडक शासन करण्यात येईल.त्यादृष्टीने कारवाई सुरू आहे.
–राजेशजी पुरी
ठाणेदार पोलिस स्टेशन , मारेगाव