Breaking News

मारेगावात फ्लेक्स चोर सक्रीय…

– निखिल मेहता यांची पोलिसात तक्रार

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

मारेगाव शहराच्या मुख्य रस्त्याने अलीकडेच अभिनंदन , वाढदिवस , जयंती शुभेच्छाचे फ्लेक्स मोठ्या प्रमाणात झळकत आहे.मात्र यावर अज्ञात चोरट्याची करडी नजर असून रात्री लावलेले फ्रेमसह बॅनर सकाळी गायब होत असल्याने चोरीची तक्रार मारेगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

अभिनंदन , शुभेच्छा सह इतरत्र बॅनर लावून आपल्या भावना प्रतिपादित करण्यासाठी मारेगाव शहराचे मुख्य चौक व रस्ते अलीकडेच गजबजत आहे.यासाठी फ्रेमसह बॅनर लावण्याचे कंत्राट संबंधित आर्ट संचालकांना देण्यात येते.रात्री बॅनर लावण्याची प्रक्रीया पूर्ण करण्याची तसदी घेतल्यानंतर सकाळी लावलेली बॅनर्स दिसेनासे होत आहे.

 

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हेमराज कळंबे यांच्या अभिनंदन बॅनर बाबत चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.मारेगाव येथील माऊली आर्ट चे संचालक निखिल मेहता यांनी 30 एप्रिल रोजी संध्याकाळी महामार्गाच्या कडेला बॅनर्स लावलेत.मात्र सकाळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हेमराज कळंबे यांचे अभिनंदन चे बॅनर्स गायब झालेत.यापूर्वीही फ्रेम सह बॅनर ची चोरी करण्यात आली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

 

परिणामी , बॅनर चोर मारेगावात सक्रीय असून अज्ञात चोरट्याचा छडा लावून बॅनर धारकांचा हिरमोड टाळावा व संचालकास न्याय द्यावा अशा आशयाची तक्रार मारेगाव पोलिसात निखिल मेहता यांनी दाखल केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment