– अकाली पाऊस वारा : प्रवाशांचा प्रश्न ऐरणीवर
बोटोणी : जयप्रकाश वनकर
गत काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होवून वादळ वाऱ्याने जनता प्रभावित झाली आहे.दरम्यान , अकाली नैसर्गिक संकटाने बोटोणी येथील पन्नास वर्षाचा प्रवासी निवारा जमीनदोस्त झाला त्यामुळे ऐन राज्यमहामार्गावरील प्रवाशांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मागील 50 वर्षांपासून बोटोणी वासीयांना ऊन वर पाऊस या पासून अविरत पणे सांभाळणारा निवारा काल दिनांक 30 एप्रिल रोजी कोसळला. बोटोनी वरून मारेगाव करंजी वणी यवतमाळ येथे परिसरातील व स्थानिकांची नेहमी ये जा असते.त्यासाठी त्यांना असणारा निवाराच काल कोलमडला.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळ वाऱ्या मुळे स्थानिकांचे बरेच नुकसान झाले आहे.
तब्बल पन्नास वर्षांपासून प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या निवाऱ्याला नवजीवन देऊन प्रवाशांना त्यांचा हक्काचा निवारा पूर्वी प्रमाणे देण्यात यावा. अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे.