– मारेगाव न्यायालयात घडले आठ वर्षानंतर मनोमिलन
– वाताहत झालेल्या मुलीला मिळाले मायबाप
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
त्यांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला.संसावेलीवर एक कळी उमलली.मात्र काही दिवसातच अगदी क्षुल्लक कारणाने वाद विकोपाला गेला.आणि तब्बल आठ वर्षांपासून ते वेगळे राहू लागले.नव्हेतर तिने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराची मारेगाव न्यायालयात केस दाखल केली.न्यायप्रविष्ठ प्रकरणात काही वर्षातच तिला खावटी सुरू झाली.न्यायाधीश निलेशजी वासाडे यांनी समुपदेशन केले. त्यांच्या प्रयत्नाने एक कुटुंब तब्बल आठ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले.विभक्त झालेल्या दोघांची खुणगाठ पुन्हा घट्ट झाली अन वाताहत झालेल्या निरागस कोवळ्या मुलीला अखेर मारेगाव न्यायालयात मायबापाची सावली मिळाली.
मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील गोपाळ व उज्वला ठाकरे 12 वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेलं जोडपं.सुरुवातीला गुण्यागोविंदाने संसार सुरू असतांना त्यांच्या संसारवेलीवर मुलीच्या रुपात एक कळी उमलली.कुटुंब म्हटल्यावर शाब्दीक खंडाजंगी नविन नाही.मात्र हा त्यांचा वाद विकोपाला जात थेट मारेगाव न्यायालयात गेला.न्यायालयात वेळ – पैसा आणि मानसिक त्रासासह दोघेही तारखेला वेगवेगळ्या कोपऱ्यात बसून शून्यात बघत पुकाऱ्याची वाट बघत सूर्यास्त होईस्तोवर दिवस न्यायालयात घालवायचे.
न्यायालय म्हटले की, पक्षकारांची धाकधूक. मोठ्याने पुकारे,शिस्तीचे करडे वातावरण अन् धीरगंभीर कामकाजाची पद्धत हे सर्व ठरलेले असते.
मात्र रविवारला मारेगाव न्यायालयात आज आगळे वेगळे मनोमिलन घडले. विभक्त राहणारे पती पत्नी यांचा एकमेकांविरुद्ध येथील न्यायालयात अनेक वर्षापासून खटला सुरू होता. कोर्टात लोकन्यायालयचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये न्यायाधिश निलेश वासाडे यांनी मौजा मांगरुळ येथील उज्वला व गोपाल ठाकरे या दोघां पतीपत्नीची समजूत काढीत समुपदेशन केले. न्यायालयात एकमेकांविरुद्ध लढण्यापेक्षा आपसी वैरभाव विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करण्याचा मौलिक सल्ला दिला.मन परिवर्तन घडलेल्या या विभक्त ठाकरे दाम्पत्याने पुन्हा एकदा संसार जोडला.आणि विभक्त झालेल्या दोघांची ऋणानुबंधाची खुणगाठ घट्ट केली. दोघांना पुष्पहार घालण्यात आले.यावेळी न्यायाधिश निलेश वासाडे अँड. हरिदास पावडे, अँड.परवेज पठाण, पोलीस उपनरीक्षक ज्ञानेश्वर सावंत, पुंडलिक साठे यांनी दांपत्यास आशीर्वाद दिले.
या लोकन्यायालात दाखलपूर्व व दाखल केसेस पैकी २३० केसेस चा निपटारा करण्यात आला. यात विविध केसेस मध्ये १२,२०,७७९/- आपसी तडजोडीत वसूल करण्यात आले.