– 18 पैकी 17 जागेवर निर्विवाद वर्चस्व
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समिती निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून तब्बल 40 वर्ष एकहाती सत्ता राखणाऱ्या महाविकास आघाडी समर्थीत पॅनलने यावेळीही आपला बुरुज राखत गड कायम ठेवला.
बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 18 जागेपैकी तब्बल 17 जागेवर महाविकास आघाडी समर्थीत शेतकरी एकता पॅनल ने विजय संपादन केला.यात अनु.जाती जमाती तुन विश्वनाथ आत्राम हे अविरोध निवडून आले.अविनाश लांबट यांची एकमेव उमेदवारी विद्यमान आमदार पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलच्या वाट्याला आली.
मारेगाव बाजार समिती निवडणूक आज दि.३० एप्रिल रोजी पार पडली.सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या निवडणूक निकालाकडे अवघ्या मारेगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले असतांना या निवडणुकीत भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार समर्थीत शेतकरी परिवर्तन पॅनल व महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी एकता पॅनल यांच्यात प्रचंड चुरस झाली.यात महाविकास आघाडीचे माजी आमदार वामनराव कासावार , विश्वास नांदेकर , जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे यांनी ‘ वज्रमुठ ‘ कायम ठेवत बाजार समितीचा गड कायम ठेवला.
फेरमतमोजनी अन तणाव सदृश्य स्थिती
निवडणूक निकाल बाजार समिती सुरू असतांना ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघात प्रफुल्ल विखनकर आणि सुरेश लांडे यांच्यातील दोन मतांच्या फरकासाठी फेरमतमोजनी करण्यात आली.
ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांत गोंधळात गोंधळ बघावयास मिळाला.पराभव अन विजयाचा अतिआत्मविश्वास येथे मात्र नडलेला दिसला.यातील एका पॅनलच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी हुज्जतबाजी करीत आपल्या कर्तव्याचा विसर व आक्रस्ताळेपणा प्रामुख्याने दाखविला.कार्यकर्त्यांना शांत आणि पांगवण्यासाठी पोलिसांना प्रचंड कसरत करावी लागली. अखेर पोलिसांकडून इन कॅमेरा उपस्थितांच्या समोर सरकताच चढते कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.तब्बल तासाभराच्या गोंधळानंतर फेरमतमोजनीत प्रफुल्ल विखनकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. यावेळी ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.निवडणूक अधिकारी किशोर इंगोले , तहसीलदार दीपक पुंडे , ना.त.किशोर यादव यांनी काम बघितले.
बाजार समितीत निवडुन आलेल्या सर्व संचालकांनी विजयाचा फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दरम्यान , निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकात खालील प्रमाणे समावेश आहे.
सर्वसाधारण सह.संस्था मतदार संघ
वसंतराव आसुटकर 160, गौरीशंकर खुराणा 153, गणुजी थेरे 130, यादव काळे115 , जीवन काळे154 , काशिनाथ खडसे 153 ,महादेव जुनगरी145
सह संस्था अनु. जमाती राखीव
संतोष मडावी 164
सर्वसाधारण महिला प्रतिनिधी
अरुणाताई खंडाळकर 185, सुनीता मस्की157
इतर मागासवर्गीय
रमण डोये 148
ग्रा.पं. सर्वसाधारण मतदार संघ
विजय अवताडे 199, प्रफुल्ल विखनकर 195
आर्थिक दुर्बल घटक
अविनाश लांबट 199
व्यापारी अडते
महादेव सारवे12 , देविदास बोबडे12
हमाल मापाडी
भास्कर धांडे 4