Breaking News

रविकांत मडावी यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सर्वत्र कौतुक

मारेगाव : न्यूजनेटवर्क

मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या डोल डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यांना नुकताच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक विभागात सह सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
रविकांत शामराव मडावी असे जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकाचे नाव आहे.सदर शिक्षक इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापक आहे .त्याचबरोबर त्यांनी तालुका स्तरावरील शैक्षणिक शिबिरामध्ये शिक्षकांना इंग्रजी विषयाचे प्रशिक्षणासह विविध नाविन्य उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे त्यांना नुकताच झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment