– सर्वसामान्य ग्राहकांना माफक दराची पर्वणी
विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव
आपल्या स्वप्नातील उभारलेलं घर कायम परिपक्व व घरांसाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्य अतिशय माफक दरात सर्वसामान्य जनतेला प्राप्त व्हावे यासाठी मारेगावात अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशनचा शुभारंभ करण्यात आला.
संकल्प नगरी , वणी रोडवर असलेल्या गुंडावार बिल्डिंग मटेरियल मध्ये सदर बिल्डिंग सोल्युशन चे उदघाटन अल्ट्राटेक सिमेंटचे मनोजजी काळे यांचे हस्ते झाले.महाले साहेब , अभियंता अरपित गोहोकार , सुरेशजी खिवंसरा , कालिका स्टील कंपनीचे विजय गणोजा यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.
यावेळी मनोजजी काळे यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून सोल्युशनची भूमिका विषद केली.अभियंता अरपित गोहोकार यांनी सोल्युशन बाबतची परिपूर्ण माहिती विवेचित केली.
यावेळी अल्ट्राटेक चे मनोजजी काळे यांचा संचालक गणेशजी गुंडावार यांनी शाल श्रीफळ देत गौरव केला. या शुभारंभ प्रसंगी अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन शुभारंभचा केक उपस्थितांनी हर्षोल्लात कापण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी अल्ट्राटेक कंपनीचे नानाविध साहित्य भावी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्धता करण्यात आले होते.प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डोहणे यांनी करून गुंडावार बिल्डिंग मटेरियलचे संचालक गणेश गुंडावार यांनी उपस्थितांचे आभार मानले.