Breaking News

संवेदना… मारेगावचे तुषार डाखरे यांची एक्झिट

– धाब्यावर आला हृदयविकाराचा तीव्र झटका

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव

येथील प्रसिद्ध डॉ.एकनाथ डाखरे यांचा एकुलता एक मुलगा तुषार डाखरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मंगळवार रात्री 9.30 वाजता निधन झाले.मृत्यूसमयी त्याचे वय 36 वर्षाचे होते.

मारेगाव येथील तुषार मेडिकल तथा गौराळा येथील बाळू धाबा चे संचालक तुषार हे मंगळवार ला मेडीकल बंद करून वणी रोड वर असलेल्या धाब्यावर गेले.रात्री 9 वाजता त्याच्या छातीत दुखू लागल्याने वणी येथे हलवित असतांना वाटेतच तुषारची प्राणज्योत मालविली.

मृदू स्वभावा असलेला तुषारचा मित्रमंडळी गोतावळा मोठा आहे.अशातच त्याची अकाली एक्झिट मन सुन्न करणारी आहे.या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक तुषार च्या पश्चात डॉ.डाखरे , आई प्रतिभा , पत्नी साक्षी व पाच वर्षांचा बाळ आहे.सकाळी 11 वाजता तुषारला स्थानिक स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment