Breaking News

खळबळजनक… मारेगावच्या महिलेची मध्यप्रदेशात दीड लाखात विक्री

कुलूपबंद पिडीत महिलेचा आर्त टाहो 

दीपक डोहणे – मारेगाव

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील दोघांनी मारेगाव येथील भाड्याने वास्तव्यात असलेल्या महिलेला थेट मध्यप्रदेश येथे दीड लाख रुपयात विक्री केल्याची घटना उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.संशायित आरोपी व पिडीत महिलेच्या शोधार्थ मारेगाव पोलिस पथक रवाना झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार , मारेगाव येथे काही वर्षांपासून ही पिडीत महिला , मुलगी व आई भाड्याची खोली करून वास्तव्यात होती.अशातच पिडीत महिलेच्या संपर्कात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील एक महिला व पुरुष आलेत.त्यांनी तुला कंपनीत नोकरी लावून देण्याचे बहाण्याने भद्रावती येथे बोलाविले.येथे तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन मध्यप्रदेश कडे रवाना झाल्याची माहिती आहे.

दरम्यान , मध्यप्रदेश राज्यातील रतलाम येथील जितेंद्र पाली या इसमास दीड लाखात सौदा करून पिडितेची विक्री केली.येथे तिचा जबरदस्तीने विवाह केल्याची माहिती निकडवर्ती यांनी दिली.

परिणामी , पिडीत महिलेला कुलूपबंद अवस्थेत दिवसभर घरात ठेवून पाली हा कामासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.जितेंद्र पाली यास चुणूक न लागता पिडीत महिलेने मारेगाव येथे नातेवाईकांना संपर्क साधून घडलेली आपबिती कथन केली आणि विक्रीचे रहस्य उलगडले.

पिडीत महिलेच्या आईने याबाबत 20 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशायितांवर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करून सदर प्रकरण मारेगाव पोलिसात वर्ग करण्यात आले. संशायित आरोपी व पिडीत महिलेच्या शोधार्थ पाच पोलीस पथकांनी मध्यप्रदेश कडे कूच केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment